मौलाना साद यांनी केली कोरोना टेस्ट; केला ‘हा’ धक्कादायक दावा

नवी दिल्ली | दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रांच तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांचा ठावठिकाणा शोधत आहे, मात्र त्यांना अद्याप यश आलेलं नाही. या दरम्यान हिंदी वृत्तवाहिनी आजतक सोबत बोलताना मौलाना साद यांनी धक्कादायक दावा केला आहे.

मी कुठं आहे याचा पत्ता क्राईम ब्रांचला आहे, असा दावा मौलाना साद यांनी केला आहे. क्राईम ब्रांचने मला नोटीस दिली आहे आणि त्या नोटीसला मी उत्तर देखील दिलं आहे, असं मौलाना साद यांनी म्हटलं आहे.

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने माझ्या मुलाच्या उपस्थितीत आमच्या घराची झडती घेतली. सोबतच मला कोरोनाची टेस्ट करण्यास सांगण्यात आलं आहे. मी कोरोनाची टेस्ट केली आहे, मात्र अद्याप रिपोर्ट आलेला नाही. रिपोर्ट आला की त्याची माहिती आम्ही क्राईम ब्रांचला देऊ, असं मौलाना साद यांनी सांगितलं.

आम्ही मरकजसाठी कोणाला आमंत्रित केलं नव्हतं. लॉकडाऊनमुळे मरकजमध्ये जमाती अडकले होते, आम्ही त्यांना त्यांच्या घरी पाठवण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली होती, मात्र ती मिळाली नव्हती, असा दावा देखील साद यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-तळीरामांच्या कोरड्या घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केलीये?; अग्रलेखातून सवाल

-आम्ही दिलेले टेस्ट किट उत्तमच पण भारतीयांना वापरायच्या कळत नाही; चीनचं भारताकडे बोट

-आतापर्यंत 957 रूग्ण कोरोनातून बरे झालेत, घाबरू नका- राजेश टोपेंच आवाहन

-तगमगणाऱ्या सर्व जीवांचे दु:ख कलावंत मनाच्या राज ठाकरे यांनी सरकारदरबारी मांडलं पण, संजय राऊतांचे शालजोडीतून टोले

-“मुख्यमंत्र्यांनी सांगावं, मी नागपुरात बसल्या बसल्या लाख-दीड लाख पीपीई किट पाठवतो”