दादा इज बॅक!; घरवापसीनंतर अजित पवार पुन्हा होणार उपमुख्यमंत्री!

मुंबई | भाजपसोबत गेलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी साथ सोडल्यानं तीनच दिवसात फडणवीस सरकार कोसळलं आहे. आता अजित पवार स्वगृही परत येण्याची शक्यता निर्माण झाली असून तेच राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, असं कळतंय.

अजित पवार पक्षात परल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे. अजित दादांना उपमुख्यमंत्रिपद मिळावं, अशी मागणी ते आता करू लागले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार देखील अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळावं, यासाठी आग्रह आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकासआघाडीचा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झालाय. आता महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार असून अडीच वर्षे काँग्रेस आणि अडीच वर्षे राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री असेल, असं कळतंय.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी सुबह का भुला शाम को घर आ जायें तो उसे भुला नहीं कहते, अजितदादांनी राष्ट्रवादीसाठी मोलाचं काम केलं आहे. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादीला गरज आहे. तर अजित पवारांनी त्यांची चूक मान्य केली आहे. त्यांची पक्षातली जागा आधी होती तिच रोहिल, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-