‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

नवी दिल्ली | पुढील 3-4 दिवसांत उत्तर आणि वायव्य भारतात उष्णतेची लाट राहील. दुसरीकडे, उत्तर-पूर्व राज्ये आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पंजाब, हरियाणा-चंदीगड आणि दिल्लीमध्ये येत्या 16 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पश्‍चिम राजस्थानच्या विविध भागातही उष्मा वाढण्याची शक्यता आहे.

पुढील 5 दिवसांमध्ये पूर्व राजस्थानमध्ये आणि 17 तारखेपर्यंत पश्चिम राजस्थानच्या काही भागात उष्णतेने लोक हैराण होतील. याशिवाय पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध भागात उष्णतेची लाट राहील

पुढील 24 तासांत आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो.

ईशान्य भारतातील उर्वरित भाग, केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

याशिवाय जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाखमध्ये काही ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ 

“मोदींच्या नावावर मतं मागून शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले” 

आलिया-रणबीरच्या फोटोंवर Ex Girlfriend कतरिनाची कमेंट, म्हणाली… 

“ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा उघड करणार”