काँग्रेसचा सोडचिठ्ठी दिलेल्या उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर?

मुंबई : काँग्रेसचा ‘हात’ सोडल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव पदरी आल्यानंतर विधानसभेच्या तोंडावर उर्मिला शिवबंधन बांधणार का, याची चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोन केल्याचं कळतंय.

गेल्याच आठवड्यात उर्मिला मातोंडकरने काँग्रेसला रामराम ठोकला होता. पक्षांतर्गत राजकारण सोडवण्यासाठी आपला वापर झाल्याची भावना उर्मिलाने व्यक्त केली होती. त्यावेळी पक्षांतराबाबत उर्मिलाने मौन बाळगलं होतं. मात्र आठवडाभरानंतर उर्मिला शिवसेनेचा झेंडा हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उर्मिला मातोंडकर यांच्याशी आपले आणि शिवसेनेचे कौटुंबिक स्नेह आहेत. त्यांच्याशी फोनवरुन झालेल्या संवादाचा राजकीय संबंध जोडू नका, असं आवाहन शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी केलं आहे.

उर्मिला यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली असली, तरी त्यांना शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याबाबत काहीच बोललो नसल्याचा दावा नार्वेकरांनी केला आहे.

मुंबई काँग्रेसच्या भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतला, असा दावा करत उर्मिला मातोंडकरने अवघ्या सहा महिन्यात पक्षाला सो़डचिठ्ठी दिली. 

महत्वाच्या बातम्या-