राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होण्याचं कारण काय?, गृहराज्यमंत्री म्हणतात…

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या दोन महिन्यात तीन वादळी सभा घेत आक्रमक हिंदूत्व राज्याच्या जनतेसमोर मांडलं आहे. त्यानंतर मात्र राज्यात वाद वाढला आहे.

1 मे रोजी राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये सभा घेत मशीदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर ठाकरे सरकार आक्रमक भूमिका घेत आहे.

औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या सभेला विविध अटींच्या अधिन राहून परवानगी दिली होती. त्या अटींची पुर्तता करण्यात आली नाही आणि अनेक नियमांचा भंग देखील केल्याचं आता उघड झालं आहे.

राज ठाकरेंनी नियम मोडल्यानं त्यांच्या औरंगाबादमध्ये सिटी चौक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या सभेचे व्हिडीओ पाहिले आहेत. त्यामध्ये त्यांना काही चुकीचं आढळल्यानं आणि नियम मोडल्याचं लक्षात आल्यानं गुन्हा दाखल करण्यात आल्याचं देसाई म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात कायद्याचं राज्य  आहे. सामान्य माणसांना त्रास होईल असं कोणीही वागू नये. कोणीही कायदा हातात घेण्याचं काम केलं तर त्याच्यावर कारवाई होणार, असंही देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.

कायदा आणि पोलीस त्यांचं काम करत आहेत. त्यांना आपलं काम करू द्या. कायदा सर्वांंना सारखा आहे. कोणीही कायद्याचं उल्लंघन करू नये, राज्यातील पोलीस सतर्क आहेत, असं देसाई म्हणाले आहेत.

दरम्यान, सर्वांनी शांतता राखण्याचं काम करावं.  दोन समाजात तेढ निर्माण होईल असं काम कोणीही करू नये, असं आवाहन देखील शंभुराजे देसाई यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 मोठी बातमी! राज ठाकरेंवर अटकेची टांगतील तलवार कायम

 सर्वांत मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

राज्यातील सर्व पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! 

मोठी बातमी! राणा दाम्पत्याला आणखी एक झटका, ‘त्या’ नोटीसने टेंशन वाढलं 

सर्वात मोठी बातमी! राज ठाकरे यांना अटक होणार?, महत्त्वाची माहिती समोर