“मंत्रीपद डोक्यावरून गेलंय, यशोमती ठाकूर यांनी सायको ट्रीटमेंट करून घ्यावी”

मुंबई | मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण उलथापालथ सुरू असल्याचं पहायला मिळतंय. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून केंद्र सरकार विरोधकांना त्रास देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

अशातच आता अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मतदार संघातील शिरजगाव मोझरी येथे भूमीपुजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी राजकीय टोलेबाजी पहायला मिळाली.

खासदार नवनीत राणा या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी राणा यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.

यशोमती ठाकूर यांना मंत्रीपद डोक्याच्या वर गेलं आहे. त्यामुळं माझा काळजी म्हणून व मोठी बहीण म्हणजे एक सल्ला आहे. त्यांनी चांगल्या डॉक्टरकडे जाऊन मनोरुग्णांचे उपचार करून घ्यावं, असा खोचक सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे.

आणखी अडीच वर्षे बाकी आहेत. त्यामुळं लगेच आपल्या डोक्याचा उपचार करून घ्यावा, असं त्यावेळी म्हणाल्या आहेत. चुकीच्या पद्धतीनं मंत्रीपद त्यांच्याकडे गेलंय त्यामुळे आता त्यांना सहन होत नाही, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

रवी यांना यांच्यापेक्षाही त्या मोठ्या आहेत. मोठ्यांचा आम्ही आदर करतो. मोठ्यांचा आम्ही कधी अपमान करत नाही. त्यांची काळजी घ्यावी.

दरम्यान, सायको ट्रीटमेंट डॉक्टर असतात त्यांच्याकडं जाऊन ट्रीटमेंट करावी. येणाऱ्या काळात त्यांना याचा फायदा होणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

महत्वाच्या बातम्या-  

मोठी बातमी! फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर मोठी कारवाई

‘मला धमकी आली तर…’; धमकी देणाऱ्यांना खासदार संभाजीराजेंचा सूचक इशारा

“देश, राज्य सगळंच तुम्हाला पाहिजे, मग आम्ही काय धुणीभांडी करायची का?”

“चंपाने सोमय्यांना हाताशी धरून टरबुजाच्या कितीही खापा केल्या तरी….” 

“तळजाईवर कुत्री आणू नका, कुत्र्यांचे लाड घरी करा, गादीवर झोपवा”