काँग्रेस राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेचा ‘या’ पक्षाला धक्का; आमदाराचा सेनेत प्रवेश

मुंबई |  बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार विलास तरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विलास तरे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केलाय.
शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला धक्के दिल्यानंतर आज आपला मोर्चा बहुजन विकास आघाडीकडे वळवला.विलास तरे हे सलग दोन वेळा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या पक्षाकडून बोईसर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

आगामी काळात आणखी कोण कोण शिवसेनेत येणार हे लवकरच कळेल, असं म्हणत आणखी काही नेते शिवसेनेत येणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विलास तरे यांनी बहुजन विकास आघाडीला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाच्या अडचणीत वाढ होणाची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-