भारत माझा देश आहे, पण….- राज ठाकरे

मुंबई | पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलून द्यावं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 9 फेब्रुवारी रोजी भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनं आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.

ही लढाई आहे. मोहल्ल्यांमधून भारतविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या विरोधातील…देशाला पोखरणारी वाळवी उखडून टाकण्यासाठी…भारत माझा देश आहे, पण तो पाकिस्तानी आणि बांगलादेश घुसखोरांचा नाही, असं या व्हिडीओमध्ये म्हणण्यात आलं आहे.

व्हिडीओच्या माध्यमातून 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन मनसेकडून करण्यात आलं आहे. अजून किती वेळ आपण गाफील राहणार आहोत? अशा मथळ्याखाली हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

दरम्यान, गिरगाव चौपाटी ते आझाग मैदान व्हाया हिंदू जिमखाना असा मनसेच्या मोर्चाचा मार्ग असणार आहे. तसेच हा मोर्चा नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए ) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात नसल्याचं राज ठाकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-रजनीकांत भाजपचे पोपट आहेत- पी.चिदंबरम

-भाजप हा फेकू लोकांचा पक्ष आहे; ममता बॅनर्जींची भाजपवर सडकून टीका

-370 कलम रद्द करणं हा मोदींचा घातक निर्णय- इमरान खान

-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांवर आली रस्त्यांवर पायी चालण्याची वेळ!

-तुम्हाला लाज वाटायला हवी; अभिनेते प्रकाश राज यांचा भाजपवर घणाघात