मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी वांद्रे संकुलात तीन मेट्रो मार्गांची पायाभरणी करण्यात आली. तसेच मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पार पडले. यावेळी मेट्रो भवन आणि मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या शिळेवर मराठी भाषा नसल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्राची ‘हिंदी’पणाकडे वाटचाल होत असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
आज उघड करण्यात आलेल्या मेट्रोच्या प्रकल्प शिळेवर #मराठी नाही, काहीही संबंध नसताना बाहेरची असलेली हिंदी मात्र आहे! महाराष्ट्राची हिंदीपणाकडे वाटचाल. राज्य शासनाचा निषेध, असं ट्वीट देशपांडे यांनी केलं आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रथम मेट्रो कोच का उद्घाटन समारोह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारत सरकार के कर कमलों द्वारा संपन्न हुआ’ असं उद्घाटन शिळेवर लिहिलेलं दिसत आहे.
यापूर्वी अनेकदा मनसेने मराठीसाठी आंदोलने केली आहेत. काही दिवसांपूर्वीच ईडीने राज यांना नोटीस पाठवल्यानंतर मनसेनेसुद्धा ईडीला पाटी बदलण्यासाठी नोटीस पाठवली होती.
आज उघड करण्यात आलेल्या मेट्रोच्या प्रकल्प शिळेवर #मराठी नाही, काहीही संबंध नसताना बाहेरची असलेली हिंदी मात्र आहे!
महाराष्ट्राची हिंदिपणाकडे वाटचाल.
राज्य शासनाचा निषेध pic.twitter.com/dfBrVIqoJm— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 8, 2019
महत्वाच्या बातम्या-
गुन्हेगारांचे वकिल ते केंद्रिय कायदामंत्री…; राम जेठमलानी यांचा थक्क करणारा प्रवास https://t.co/ePElV4vrHq #jethmalani
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 8, 2019
खोटं बोलून जनतेची दिशाभूल करणारा मुख्यमंत्री इतिहासात झाला नाही; काँग्रेसचा घणाघात https://t.co/ne24JwSlTe @INCMaharashtra @sachin_inc @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 7, 2019
‘राज’गर्जना झाली! पैसेच पाहिजे असतील तर मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या ना… https://t.co/5uYUBoATvO @RajThackeray @JaykumarRawal
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 7, 2019