विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता!

मुंबई |  मनसेचा सोमवारी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा होणार आहे. यावेळी ते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या एमआयजी क्लब या ठिकाणी हा मेळावा होणार आहे. राज ठाकरे या मेळाव्यात इच्छुक उमेदवारांसोबत संवाद सांधणार आहेत, अशी माहिती कळतीये.

मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जातीये.

निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या अशी आग्रही मागणी राज ठाकरे यांनी घेतली होती. मात्र निवडणूक आयोगाने निवडणूक ईव्हीएमवरच होणार हे स्पष्ट केल्याने मनसे निवडणूक लढणार की नाही अशी चर्चा होती. मात्र मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून राज ठाकरे यांनी त्यांचा निर्णय बदलला, असंही समजतंय.

लोकसभा निवडणुकीत मनसेने भाजप विरोधात प्रचारसभा घेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला एकप्रकारे मदत केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी, निवडणूक आयुक्तांच्या भेटी घेतल्या होत्या.

दरम्यान, राज ठाकरे सोमवारच्या मेळाव्यात काय बोलणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

महत्वाच्या बातम्या-