मुंबई | शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय मजुरांच कौतुक करताना दिसत आहे. यावरून मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी अरविंद सावंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्रातील तरुणांच्या काम करण्याच्या क्षमेतवर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. परप्रांतीय मजुरांची स्तुती करुनच तुम्ही थांबला नाहीत, तर तुम्ही महराष्ट्रात या स्वागत आहे, असं वक्तव्य केलं. आपण मुंबईचे महाराष्ट्राचे खासदार आहात हे विसरु नका, अशी आठवण नितीन सरदेसाईंनी सावंतांना करुन दिली आहे.
तुम्ही महाराष्ट्रातील तरुणांची हेटाळणी केली आणि परप्रांतीयांचे गोडवे गायले. आपल्या मुलाला ‘कार्टा’ आणि दुसऱ्याच्या मुलाला ‘बाब्या’ बोलणं बंद करा, असं सरदेसाई यांनी म्हटलं आहे.
आपण महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या रोजगाराच्या संधीचा विचार केला पाहिजे. तो न करता परप्रांतीय किती चांगलं काम करतात याची स्तुती करता?, अशा शब्दांत सरदेसाईंनी अरविंद सावंतांना सुनावलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“कोरोना रुग्णांसाठी मुकेश अंबानींचा अँटिलिया टॉवर ताब्यात घ्या”
-भारताला ‘या’ बाबतीत जगातल्या सर्वोच्च तीन देशांच्या क्रमवारीत आणायचंय- राजनाथ सिंग
-गौतम गंभीर म्हणाला, धोनीने मोठी चूक केली, त्याने ही चूक केली नसती तर…
-सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती रुग्णालयात
-शाळा सुरु करण्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय