मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजचा मराठवाडा दौरा केला रद्द

मुंबई | पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात नवा झेंडा देऊन पक्षाला नवी दिशा देऊ पाहणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजचा मराठवाडा दौरा रद्द केल्याची माहिती आहे. तब्येतीच्या कारणावरून हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचं कळतंय.

पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा महत्वाच्या मानला जात होता. मराठवाड्यात आपला जनाधार वाढवण्याची आवश्यकता असल्याने मनसेनं मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं आहे.

आपल्या अधिवेशनात प्रखर हिंदुत्वाची वाट धरल्यानंतर मनसेनं मराठवाड्याकडे लक्ष केंद्रीत करणं हे पक्षाच्या भविष्यातील वाटचाल कशी असेल याचे संकेत देणारी आहे.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मराठवाड्यातील एकमेव आमदार होते. जाधव यांनी मनसेला रामराम केल्यानंतर मराठवाड्यात पोकळी निर्माण झाली.

महत्वाच्या बातम्या- 

-पडद्यावरच्या खलनायकानं ठेवला जनतेसमोर एक नवा आदर्श

-अशोक चव्हाणांच्या त्या वक्तव्याला नवाब मलिकांचं प्रत्युत्तर, म्हणतात…

-“खोलीत दोन हाणा पण बाहेर साहेब म्हणा”

-महाविकास आघाडीचा साहित्यिकांना दे धक्का; अशासकीय नियुक्त्या रद्द

-दात कोरून पोट भरण्याचे उद्योग; शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका