“नशीब उरलेल्या खेळांडूंचा कॅप्टन अजून बोलला नाही, अगला राष्ट्रपती हमारा होगा”

मुंबई | द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. यावरून मनसेने शिवसेना खासदार संजय राऊतांना टोला लगावला आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांनी एक ट्विट केलं आहे. यामधून त्यांनी शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

आता काहीच पर्याय उरलेला नाही म्हटल्यावर नाईलाजाने दिलेले समर्थन! तरी नशीब उरलेल्या राखीव खेळांडूंचा कॅप्टन अजून बोलला नाही, अगला राष्ट्रपती हमारा होगा, असा टोला राजू पाटील यांनी संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे लगावला आहे.

दरम्यान, राज्यात एकीकडे सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना दुसरीकडे देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (Presidential election 2022) रणधुमाळी सुरू आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेरीस एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याची घोषणा केल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘राजनाथ सिंहांचा फोन आला आणि म्हणाले अस्सलाम वालेकुम’, उद्धव ठाकरेंचा खुलासा

‘मला ईडी आली नाही पण फक्त…’, बंडखोरीनंतर शीतल म्हात्रेंचं स्पष्टीकरण

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीचा मोठा दावा, रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ

शिवसेनेनं मुर्मूंना पाठिंबा जाहीर करताच बाळासाहेब थोरातांचं सूचक ट्विट, म्हणाले…