मोदींचा अमेरिकेत बोलबाला…! सभेसाठीचं स्टेडिअम हाऊसफुल्ल

हस्टन : अमेरिकेच्या हस्टन शहरात सध्या ‘ हाउडी, मोदी’ या कार्यक्रमाची जंगी तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 22 सप्टेंबरला अमेरिकेच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी अमेरिकेतील हस्टन शहरातील भारतीयांशी ते संवाद साधणार आहेत. हस्टनच्या रस्त्यांवर या कार्य़क्रमाचे मोठ-मोठे बॅनर लावण्यात आले आहेत.

दक्षिण-पश्चिम अमेरिकेत ‘हाऊ डू यू डू’ (आपण कसे आहात?) याला सामान्य बोली भाषेत ‘हाउडी’ असं म्हटलं जातं. 

हस्टन शहरात राहणाऱ्या सर्व भारतीय लोकांच्या घराबाहेर तिरंगा फडकलेला आहे. या कार्यक्रमासाठी सर्वजण खूप उत्साहित आहेत आणि आम्हाला येणाऱ्या पिढ्यांसाठी हा कार्यक्रम विस्मरणीय बनवायचा आहे, असं एका अमेरिकेतील भारतीयाने म्हटलं आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात ‘वुवेन : दी इंडियन-अमेरिकन स्टोरी’ ने होणार आहे. 90 मिनिटांच्या या कार्यक्रमात सांस्कृतिक, बौद्धिक आणि सामाजिक क्षेत्रात अमेरिकेतील भारतीयांचं योगदान दाखवलं जाणार असल्याचं समजतंय.

दरम्यान, 2014 ला पंतप्रधान झाल्यापासून मोदी तिसऱ्यांदा अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करणार आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या –