“मोदीजी… तुमच्या कौतुकाची थाप आणि देशातील नागरिकांच प्रेम हाच आमच्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे”

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पाठोपाठ सुरेश रैनानं देखील आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. महेंद्र सिंग धोनी आणि सुरेश रैना दोघांनी क्रिकेट विश्वात आपल्या खेळाबरोबरच मैत्रीचाही एक वेगळा ठसा उमटवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोघांनाही एक पत्र लिहीत त्यांना कौतुकाची थाप देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरेश रैनाला लिहिलेल्या पत्रात त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. तसेच मोदी यांनी सुरेश रैनाच्या कारकीर्दीला सलाम केला आहे. मोदींच्या पत्रासाठी आभार व्यक्त करताना सुरेश रैनानं देखील मोदींना एक पत्र लिहिलं आहे. सुरेश रैनानं हे पत्र ट्वीटरवर शेअर केलं आहे.

जेव्हा आम्ही खेळतो तेव्हा आम्ही राष्ट्रासाठी रक्त आणि घाम गाळत असतो. त्याबद्दल देशातील नागरिकांडून मिळणार प्रेम आणि पंतप्रधानांच्या कौतुकांचा वर्षाव हाच आमच्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे. मोदीजी तुम्ही दिलेली कौतुकाची थाप आणि शुभेच्छांसाठी मी आपले आभार मानतो. जय हिंद, असं म्हणत रैनानं मोदींचे आभार व्यक्त केले आहेत.

दरम्यान, महेंद्रसिंग धोनी याने आंतराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर करताच काही मिनिटातच सुरेश रैनानं हा महत्वपूर्ण निर्णय घेत आपलीही आंतराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली होती. मोदींनी या दोघांप्रती आदर व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“मोदीजी… तुमच्या कौतुकाची थाप आणि देशातील नागरिकांच प्रेम हाच आमच्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे”

“प्रवीण तरडेंनी काल संविधानावर गणपती बसवत केलेल्या अक्षम्य कृत्याची माफी मागितली पण…”

“चंद्रकांत पाटलांचं झालंय असं की, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून”

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयला शोधावी लागणार ‘या’ प्रश्नांची उत्तर

कोरोनावर मात करायला लागतील इतकी वर्ष; जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचं मत