“मरकजमधील व्यक्तींनी पुढे येऊन तपासणीसाठी सहकार्य करावं, महाराष्ट्रात कोणताही धार्मिक कार्यक्रम नको”

मुंबई | दिल्लीतल्या मरकजमुळे कोरोनाच्या चिंतेत भर पडली आहे. ही बाब ध्यानात घेऊन महाराष्ट्रात कोणत्याही जाती-धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाहीत, याची खबरदारी घ्या. प्रसंगी मी स्वत: त्यांच्या आयोजकांशी बोलेन पण महाराष्ट्रात कोणताही धार्मिक कार्यक्रम नको आणि मरकजमधील सहभागी व्यक्तींनी तातडीने पुढे येऊन आपल्या तपासणीसाठी सहकार्य कराव, असं आवाहन नागरिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

आपण नागरिकांच्या सुविधेसाठी 24 तास दुकाने उघडी ठेवली आहेत मात्र काही ठिकाणी लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत असे दिसते. भाजीबाजारांमध्ये सुद्धा सुसूत्रता आणणं आवश्यक आहे. तिथे शिस्त लावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

प्रमाणे आरोग्य यंत्रणा, पोलीस राबताताहेत त्याप्रमाणे राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सर्व महसूल यंत्रणा 24 तास काम करते आहे. त्यासाठी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे, असं ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोनाचे संकट जाईस्तोवर कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही निमित्ताने गर्दी होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या. असंंही उद्धव ठाकरे म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-कोरोनाच्या लढ्यात इंदोरीकर महाराजांची ‘लाखमोलाची’ मदत!

-“संजय राऊत म्हणजे शरद पवारांच्या घरचं खरूजलेलं कुत्रं”

-अशा लोकांची आता खैर नाही; अजित पवारांचा इशारा

-तबलिगी जमातीचे लोक डाॅक्टरांवरच थुंकले; शिवीगाळ केल्याचाही आरोप

-जमत नसेल तर घरी जा, हॉस्पिटलला उकिरड्याची अवकळा पाहून तुकाराम मुंढेंचा संताप