नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांवर केला ‘हा’ अतिशय गंभीर आरोप

अमरावती : मुख्यमंत्री कार्यालयातून ‘आरएसएस’च्या कार्यकर्त्यांवर दर महिन्याला 50 कोटी खर्च केले जातात, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने ‘महापर्दाफाश’ यात्रा काढली आहे. या यात्रेला सुरुवात होताच नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत.

विकास केवळ देवेंद्र फडणवीस यांचाच झाला आहे. सरकारचे खाते अमृता फडणवीस या काम करत असलेल्या बँकेत वळते केले आहे, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

अमरावतीतून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला सुरवात झाली होती. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ‘महापर्दाफाश’ यात्रेला आजपासून अमरावतीमधून सुरवात केली आहे.

गिरीश महाजन यांनी महापुरादरम्यान सेल्फी व्हिडिओ काढल्याने त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. हाच मुद्दा पकडत महापर्दाफाश यात्रेत नाना पटोले यांनी महाजनांवरही जोरदार टीका केली.

गिरीश महाजन हे जलसंपदा मंत्री नसून जोकरमंत्री आहेत, असं म्हणत नाना पटोले यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, गेल्या 5 वर्षात सरकारने ओबीसींची शिष्यवृत्ती थांबवली. हे सरकार एससी, एसटी, ओबीसी विरोधी आहे, असा टीकाही पटोले यांनी सरकारवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-