आघाडीत बिघाडी?, महाविकास आघाडीबाबत नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

औरंगाबाद | राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेचे बिनसल्यावर महाविकास आघाडीची (MVA) स्थापना झाली होती. या आघाडीत शिवसेना (Shivsena), काँग्रेस (INC) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) असे तीन पक्ष आहेत.

या आघाडीचे सरकार शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडामुळे पडले. त्यानंतर देखील महाविकास आघाडी कायम राहीली. त्यांनी विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून कामाला सुरुवात केली.

पण आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर ही युती तुटणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. आता पटोलेंच्या वक्तव्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.

महाविकास आघाडी कोणतीही नैसर्गिक युती नाही, किंवा कोणतीही पर्मनंट आघाडी नाही, असे नाना पटोले म्हणाले. विपरीत परिस्थितीत हे तिनही पक्ष एकत्र आले होते. असे देखील पटोले म्हणाले.

औरंगाबादेत झालेल्या एका कार्यक्रमात नाना पटोले बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली आणि महाविकास आघाडीच्या भविष्यावरही भाष्य केले. त्यामुळे आता आघाडीत बिघाडी झाले असे म्हणता येईल.

पहाटेचे सरकार पडले तेव्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्याकडे आले होते. त्यामुळे पक्षाच्या आदेशाला मान देत आम्ही आघाडीत आणि सत्तेत आलो.

कोणताही निर्णय घेताना तो चर्चा करुन आणि सर्वांच्या मताने घ्यायला हवा, पण आम्हाला विचारले देखील जात नाही, अशी टीका पटोेलेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

विधानसभेत राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेते पद मिळाले. विधान परिषदेवर आम्हाला पद हवे होते. बसून निर्णय घेता आला असता, मात्र आम्हाला त्यांना कळविले नाही. आणि परस्पर निवड केली.

शिवसेेना आणि राष्ट्रवादीने विधान परिषदेवर विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवेंची (Ambadas Danave) निवड केल्याने नाना नाराज असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी ही अनैसर्गिक युती तोडण्याचे संकेत दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

‘आरती करा त्या संजय राठोडाची’, पूजा चव्हाणची आजीची संतप्त टीका

‘कसला बोगस विनोद करताय?’, मोदींचा तो दावा नितीश कुमारांनी फेटाळला

‘आता माझ्या विरोधात काही बोललात तर…’, चित्रा वाघ विरोधात संजय राठोड आक्रमक

केंद्र सरकारची “हर घर तिरंगा” योजना वादात; वरुण गांधींचा मोंदींना घरचा आहेर…

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, महत्वाची माहिती समोर…