पंतप्रधान मोदींनी फुंकलं दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग!

नवी दिल्ली | दिल्लीकरांना आता खोटी आश्वासने मिळणार नाहीत. कॉलनींचे प्रश्न आम्ही सोडवत आहोत. अनधिकृत वसाहतींना अधिकृत केलं. आतापर्यंत दिल्लीकरांना खोट्या आश्वासनांना बळी पडावं लागलं. ते आता होणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकलं आहे.

फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी मोदी यांनी या सभेद्वारे दिल्लीकरांना जोरदार आश्वासने दिली आहेत. तसंच मोदींनी यावेळी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली आहे.

आम्ही काम करत होतो तर त्यात आडकाठी आणण्याचं काम ते करत होते. पण, त्यांच्याकडून काहीही साध्य झालं नाही. कारण समस्या तशाच ठेवणं हे आमच्या संस्कारात नाही, असा टोलाही नरेंद्र मोदी यांनी यावेळी लगावला आहे.

दरम्यान, दिल्लीतील 2000 व्हीआयपी बंगले आम्ही खाली केले. पण माझ्यासाठी तुम्हीच व्हीआयपी आहात. दिल्लीकरांना सुविधा मिळाव्यात हेच आमचं उद्दिष्ट आहे, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-