देशातील सहा कोटी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा झटका!

नवी दिल्ली | मोदी सरकारने देशातील सहा कोटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. एका बाजूला किमान निवृत्ती वेतन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना दुसऱ्या बाजूला सरकारनं ईपीएफओचे व्याज दर कमी केले आहेत.

2019-20 या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीवर 8.50 टक्के व्याज मिळणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात ईपीएफवरील व्याजदर 8.65 टक्के होता. मोदी सरकार ईपीएफ कपात करेल अशी शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती.

अखेर आज ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत आज शिक्कामोर्तब झालं. याच बोर्डकडून पीएफच्या व्याजाची टक्केवारी निश्चित केली जाते. या निर्णयाला अर्थ मंत्रालयाची मंजुरी आवश्यक असते.

दरम्यान, ईपीएफओला चालू वर्षी व्याजदर गेल्यावर्षीप्रमाणे देण्यात अनेक अडचणी आहेत. गेल्या वर्षी दीर्घ मुदतीच्या ठेवी, रोखे मदून ईपीएफओला मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अण्णा हजारे यांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; पत्रात म्हणतात…

-दाभोळकर हत्याप्रकरणातील ‘हा’ मोठा पुरावा सापडला सीबीआयच्या हाती!

-…म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या 7 खासदारांना केलं निलंबित!

-इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेट संघ पोहोचला अंतिम फेरीत!

-तक्रार मागे घे नाही तर…; विद्या चव्हाणांनी सुनेला धमकावलं