जामिया आणि शाहीनबागेतील आंदोलनं म्हणजे देशाच्या सौहार्दाला बाधा- नरेंद्र मोदी

मुंबई |  नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जामिया आणि शाहीनबागेतल्या आंदोलनापाठीमागे विशिष्ट असं पॉलिटिकल डिझाइन आहे आणि या डिझाईनचा देशाच्या सौहार्दाला बाधा आणण्याचा डाव आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ आल्याने स्वत: पंतप्रधान मोदी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. आज दिल्लीतल्या कडकडडुमा येथे मोदींनी सभा घेत आम आदमी पक्षावर आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

जामिया आणि शाहीनबागेतील आंदोलनं म्हणजे योगायोग नाही तर देशाच्या सौहार्दाला बाधा आणण्याचा डाव आहे आणि हाच डाव आपल्याला हाणून पाडायचा आहे, असं मोदी म्हणाले. सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या लोकांना आता धडा शिकवण्याची वेळ आलीये, असं म्हणत त्यांनी दिल्लीकरांना भाजपला साथ देण्याची विनंती केली.

दरम्यान, दिल्लीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भाजपला साथ द्या. देशाच्या समोरचे प्रश्न सोडवण्यासाठी गेली  6 वर्ष प्रयत्न करतोय दिल्लीचा चेहरा बदलण्यासाठी तुमच्या मदतीचा हात लागेल, असं मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-उद्धव ठाकरेंना शब्द दिला तर तो पाळायला पाहिजे पण…- सुधीर मुनगंटीवार

-मुनगंटीवारांची पुन्हा शिवसेनेला प्रेमाची हाक; ‘तू यार है किसी और का’ म्हणत सेनेला प्रस्ताव!

-उदयनराजेंची पुढची राजकीय दिशा भाजपने ठरवली; घेतला हा मोठा निर्णय!

-दिल्ली बदलायची असेल तर आमच्या हातात सत्ता द्या- नरेंद्र मोदी

-मुख्यमंत्र्यांनी सामनाला दिलेली मुलाखत म्हणजे घरगुती आणि बालिश; राणेंची बोचरी टीका