मुंबई | बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये मोडणारं एक नाव म्हणजे नसीरुद्दीन शाह. अभिनया इतकेच स्पष्ट वक्तेपणा आणि परखड व्यक्तिमत्वासाठी नसीरूद्दीन शाह ओळखले जातात. अभिनय संपला तर मी सुद्धा स्वत:ला संपवेल, असं धक्कादायक वक्तव्य नसीरूद्दीन शाह यांनी केलं आहे.
अभिनय हा माझा श्वास आहे. माझ्यासाठी प्रेक्षकांना देण्यासारखं काही आहे, या एकाच विश्वासासोबत मी रोज उठतो. माझ्याकडे देण्यासारखं आहे आणि मी भाग्यवान आहे की प्रेक्षक मला पाहू इच्छितात, असं नसीरूद्दीन शाह यांनी म्हटलं आहे. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.
आजही मी सकाळी उठल्यावर अभिनयाचा सराव करतो. एखादा पैलवान सकाळी उठून व्यायाम करतो, गायक भल्या पहाटे गाण्याचा रियाज करतो, अगदी त्याचप्रमाणे मी देखील न चुकता रोज सकाळी सराव करतो, असं नसीरूद्दीन शाह यांनी सांगितलंय.
अभिनय हे माझे वेड आहे. सकाळी उठून मी अभिनय करू शकलो नाही तर मी आत्महत्या करेन, असे मला अनेकदा वाटते. अभिनयाशिवाय आयुष्याची कल्पनाही मी करू शकत नाही, असं शाह यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
-डॉक्टरांवर हल्ला केल्यास होणार अजामीनपात्र गुन्हा दाखल; मोदी सरकारचा मोठा निर्णय
-आमचा उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीला विरोध नाही- चंद्रकांत पाटील
-चार महिन्यात सोलापूरला राष्ट्रवादीचा तिसरा पालकमंत्री