दिल्लीत पैसा हरला… केजरीवालांचा विकास जिंकला; राष्ट्रवादीची भाजपवर टीका

मुंबई |  दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट व्हायला हळूहळू सुरूवात झाली आहे. सुरूवातीपासूनच अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपने जोरदार मुसंडी मारली आहे. तर भाजपला मात्र अपेक्षित यश मिळालेलं दिसत नाही. दिल्लीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

दिल्लीत धन बल और छल हार गया, असं म्हणत दिल्लीत विकास जिंकल्याचं मलिक म्हणाले आहेत. दिल्लीत देशद्रोही भाजपला लोकांनी नाकारलं आहे, अशी घणाघाती टीका मलिक यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशद्राही पक्षाला मतदान करू नका, असं आवाहन केलं होतं. लोकांनी मोदींचं ऐकलं आणि देशद्रोही पक्षाला घरी बसवलं, असा टोला मलिक यांनी लगावला आहे.

धुर्वीकरण और बटवारे की राजनीती हारी… भाईचारा और एकता की जीत हुई…. अहंकारी हारा जनता जीत गई, असं ट्वीट करत मलिक यांनी दिल्लीच्या विजयाचं विश्लेषण केलं आहे.

दुसरीकडे दिल्ली विधानसभेचे जे काही कल हाती येत आहेत यामध्ये भाजप आणि आपमध्ये मोठं अंतर आहे. तरीसुद्धा सगळे निकाल स्पष्ट व्हायला आणखी काही वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. मला आशा आहे की भाजपला आणखी काही ठिकाणी विजय मिळेल, असं दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी म्हणाले.

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्लीत ‘आप’ची जोरदार आघाडी; पाहा कोण किती जागांवर आघाडीवर

-दिल्लीमध्ये काहीही होऊ…. मी जबाबदार- मनोज तिवारी