‘मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते’; नवाब मलिक यांचं सूचक ट्विट

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीवर आरोप करताना शायरीचा वापर मोठ्या खुबीनं केला आहे. परिणामी त्यांच्या शायराना अंदाजाची चर्चा राज्यात जोरात आहे.

2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील एका क्रुझ पार्टीवर धाड टाकत एनसीबीनं मोठी कारवाई केली होती. या कारवाईत बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती.

आर्यन खानच्या अटकेनंतर या ड्रग्ज प्रकरणानं अनेक नवीन वळणं घेतलीली राज्यासह देशानं पाहिली आहेत. परिणामी सध्या राज्यात एनसीबी आणि एनसीपी वाद पेटला आहे.

एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राज्याला बदनाम करण्यासाठी आर्यन खानला गोवल्याचा आरोप करण्यात आला होता. हा अरोप वानखेडे यांनी फेटाळून लावला आहे.

समीर वानखेडे यांनी आपल्या जात प्रमाणपत्राचा खोटा दाखला बनवल्याचा मलिक यांचा आरोप होता. यावरून आमच्या परिवाराची नाहक बदनामी केल्याचं समीर वानखेेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी म्हटलं होतं.

मलिक यांच्याविरोधात ज्ञानदेव वानखेडे यांनी उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीच दावा दाखल केला आहे. याला उत्तर देताना नवाब मलिक यांनी ट्विट करत उत्तर दिलं आहे.

मेरे जबाॅं के बंद करे या मुझे असीर करे, मेरे खयाल को बेडी पहना नही सकते, असं ट्विट करत नवाब मलिक यांनी ज्ञानदेव वानखेडे यांना उत्तर दिलं आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर पुरावे दाखवत अरोप केले होते. अशातच मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणात राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतल्यानं राज्यात खळबळ माजली आहे.

नवाब मलिक यांच्या आरोपांवर फडणवीस दुपारी 12. 30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेकडं अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. परिणामी राज्याच्या राजकारणात विविध बैठकांच्या माध्यमातून मंथन करण्यात येत आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांच्या आरोपांवर आणि शायराना अंदाजांवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. नवाब मलिक हे सध्या मंत्रीमंडळाचे सदस्य नसल्यासारखे वागत असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

थोडक्यात बातम्या 

“2 वर्ष प्रयत्न करुनही ठाकरे सरकार मजबूत, आमचं काय उखडणार?” 

“माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात, आता मी ढवळाढवळ करू का?” 

शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘हा’ नियम बदलणार

 शेवट गोड! टीम इंडियाकडून विराट कोहली आणि रवी शास्त्रींना विजयी निरोप

‘देवेंद्रजी सॉरी, तुमचं नाव…’; मोदींसमोर उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना चिमटे