अशोक चव्हाणांच्या त्या वक्तव्याला नवाब मलिकांचं प्रत्युत्तर, म्हणतात…

मुंबई | किमान समान कार्यक्रमावर राज्यातील सरकार स्थापन झालं आहे. कोणीही कोणाकडून काहीही लिहून घेतलं नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं किमान समान कार्यक्रमासाठी सह्या केल्या आहेत, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अशोक चव्हाणांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अशोक चव्हाण यांच्या बोलण्याची पद्धत चुकीची आहे, असं म्हणत नवाब मलिक यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

संविधानाच्या चौकटी राहून हे सरकार चाललं पाहिजेे. तसेच घटनाबाह्य काम करणार नाही हे शिवसेनेकडून लिहून घेतलंय, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रियी दिली आहे. तसेच कोणीही कोणाकडून काहीही लिहून घेतलं नाही, असं मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण नेमके काय म्हणाले माहिती नाही. पण संविधानाच्या चौकटीतच सरकार चालतं. ते सगळ्यांना बंधनकारक आहे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“खोलीत दोन हाणा पण बाहेर साहेब म्हणा”

-महाविकास आघाडीचा साहित्यिकांना दे धक्का; अशासकीय नियुक्त्या रद्द

-दात कोरून पोट भरण्याचे उद्योग; शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका

-“फडणवीसांना आपल्याच कार्यकर्त्यांवर विश्वास नसून त्यांना चोरांच्या टोळीत बसलोय की काय असं वाटत”

शरद पवारांना मी देव मानतो- इंदुरीकर महाराज