नवाब मलिकांचा गौप्यस्फोट; क्रांती रेडकरचे ‘ते’ कथित चॅट केले शेअर

मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक गेल्या काही कालावधीपासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ पहायला मिळत आहे.

नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकणावरुन समीर वानखेडे यांच्यावर अनेक ताशेेरे ओढले. यानंतर वानखेडेंंविषयी रोज नवनवीन खुलास्यांचा सपाटाच लावलेला पहायला मिळाला. यासोबत मलिकांनी भाजपवरही हल्लाबोल चढवलाय.

नुकतंच मलिकांनी केलेल्या आरोपांवरुन समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मानहानीचा दावा टाकला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयानं त्यांनी केलेली मागणी अमान्य केली.  नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे आहेत, असं प्रथमदर्शनी वाटत नाही, असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं आहे.

समीर वानखेडे प्रकरणी नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा ट्विट करत खळबळ माजवली आहे. मलिकांनी आता क्रांती रेडकरच्या चॅटचे स्क्रीनशाॅट शेअर केले आहेत. त्यामुळे या वादात आणखी एक ठिणगी टाकल्यानं हा वाद आणि भडकण्याची शक्यता आहे.

नवाब मलिक यांनी क्रांती रेडकरच्या चॅटचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. कॅप्टन जॅक स्पॅरो नावाच्या एका व्यक्तीनं नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या संबंधीत पुरावे असल्याचं क्रांती रेडकरला सांगितलं आहे. तर हे पुरावे दिले तर बदल्यात तुला बक्षीस दिलं जाईल, असा मेसेजही क्रांतीनं केला असल्याचं या चॅटमध्ये दिसत आहे.

पुढे कॅप्टन जॅक स्पॅरो नावाच्या व्यक्तीनं नवाब मलिक आणि राज बब्बर यांचा फोटो पाठवला. राज बब्बरची बायकोही त्यांना लाडाने दाऊद म्हणते असं त्यानं म्हटलं. या चॅटचा स्क्रीनशाॅट नवाब मलिकांनी शेअर केला आहे.

माय गॉड! सकाळी सकाळी काय जोक मिळाला, आनंद घ्या. सर्वांचा दिवस चांगला जावो, असं कॅप्शन देत नवाब मलिक यांनी हे स्क्रीनशाॅट शेअर केले आहेत.

दरम्यान, रोज नवनवीन गौप्यस्फोट करत नवाब मलिक यांनी तर समीर वानखेडेंवर आरोपांचा सपाटाच लावला आहे. कागदपत्र शेअर करत नवाब मलिक यांनी अनेक खुलासे केले. त्यामुळे समीर वानखेडे याप्रकरणात अधिक गुंतत गेेले.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  “एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये येऊन आयुष्य सुखकर करावं”

“…अन्यथा सरकार बरखास्त करून निवडणुकांना सामोरं जा” 

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती! 

पुढील दोन दिवस राज्यातील ‘या’ ठिकाणी पाऊस, हवामान खात्याचा इशारा 

  ‘सत्यमेव जयते’; मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर नवाब मलिक यांचे सूचक ट्विट