आर्यन खान प्रकरणातून समीर वानखेडेंना हटवताच नवाब मलिकांचं सूचक ट्विट, म्हणाले…

मुंबई | आर्यन खान केसचा तपास एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. आर्यन खान केससह सहा केसेस वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आल्या आहेत.

विविध आरोपांनंतर वानखेडेंकडून हा तपास काढण्यात आला आहे. सर्व केकेसचा तपास एनसीबीची दल्ली टीम करणार आहे. तशी माहिती एनसीबीचे वरीष्ठ अधिकारी मुथा अशोक जैन यांनी दिलीये.

आर्यन खानसह सहा प्रकरणांचा तपास आता दिल्ली एनसीबी करणार आहे. यामध्ये नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. अरमान कोहली, इक्बाल कासकर, काश्मीर ड्रग्ज प्रकरणाचा तपासही वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

मंत्री नवाब मलिक सातत्यानं एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर आरोप आणि चिखलफेक करत होते. आता समीर वानखेडेंना आर्यन खान प्रकरणातून हटवण्यात आल्यानंतर नवाब मलिकांनीही सूचक ट्विट केलंय. त्या ट्विटमधून त्यांनी अनेकांवर निशाणा साधलाय.

आर्यन खान प्रकरणासह 5 प्रकरणांमधून समीर वानखेडे यांची हकालपट्टी करण्यात आलीय. एकूण 26 प्रकरणे तपासण्याची गरज आहेत. ही तर फक्त सुरुवात आहे. ही यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही ते करू, असंही नवाब मलिक म्हणालेत.

समीर वानखडे हे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर या पदावर होते आणि त्या पदावरच ते राहणार आहेत. मात्र ते आता रिपोर्टिंग दिल्ली एनसीबीच्या अधिकाऱ्यांना करणार आहेत. या सहा प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीचे अधिकारी संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली केला जाणार आहे.

दरम्यान, क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप होत होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी क्रुझवरील छापेमारी हा प्लान होता असा आरोप करण्यापासून ते वानखेडेंच्या राहणीमानापर्यंत विविध आरोप केले होते.

वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावरही त्यांनी संशय व्यक्त केला होता. त्यामुळे वानखेडे वादात सापडले होते. त्यानंतर क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील पंचानीही धक्कादायक कबुली दिली होती.

काही पंचाना अटकही करण्यात आली होती. मुंबई एनसीबीकडून शाहरुख खानकडून 25 कोटींची मागणी केल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

 

महत्त्वाच्या बातम्या-

आर्यन खानप्रकरणात सर्वात मोठी घडामोड; समीर वानखेडेंची उचलबांगडी 

29 नोव्हेंबरला ठाकरे सरकारची अग्नीपरीक्षा, भाजप डाव साधणार?

“रवी शास्त्री 24 तास नशेत असतात”; आरोपांनी भारतीय टीममध्ये मोठी खळबळ

मोदी सरकारकडून दिवाळी भेट! पेट्रोल आणि डिझेल ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त

”The Lalit’ में राज छुपे है’; नवाब मलिकांकडून भाजपला खास दिवाळी शुभेच्छा