दिल्ली हिंसाचारात हिंदू , मुस्लीमाचं नाहीतर माणुसकीचं रक्त वाहिलं- डॉ.अमोल कोल्हे

नवी दिल्ली| दिल्ली हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी काल संसदेत भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला. दिल्लीत नागरीकत्व सुधारणा विधेयकावरुन झालेल्या  हिंसाचारा प्रकरणी ते बोलत होते ते म्हणाले की या हिंसाचारात मुस्लीम, हिंदू  मरण पावले नाहीत, तर या हिंसाचारात कोणी मरण पावलं असेल तर तो माणूस मरण पावला आहे.

जे रक्त सांडलं ते हिंदूचं किंवा मुस्लीमांचं नाहीतर ते माणसाचं वाहिलं. ज्या नाल्यांमध्ये मृतदेह सापडले तो कोणाचा तरी भाऊ होता, कोणाचा मुलगा होता, कोणाचा नवरासुद्धा होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली आहे, असं अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.

या हिंसाचारामुळं आपल्या देशाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. यावरच अमोल कोल्हेंनी सरकारला प्रश्न विचारले ते म्हणाले दिल्ली पोलिस हा हिंसाचार रोखण्यासाठी समर्थ नव्हते का?  आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यावर वेळीच कारवाई का करण्यात आली नाही? ही सगळी जबाबदारी कोणावर होती आणि ही सगळी जबाबदारी घेण्यासाठी ते तयार आहेत की नाही? असा सवाल  कोल्हेंनी यावेळी विचारला.

आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना आपण विचारणार आहात का, की जी मुलं अनाथ झाली, ज्या आमच्या बहिणी विधवा झाल्या, त्या जीवांची भरपाई कोणं देणार? असंही ते म्हणाले

महत्वाच्या बातम्या – 

-शरद पवारांची संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रकातून समोर आली माहीती

“कोरोनो गो…. नंतर आता ‘महाविकास आघाडी गो’, असं म्हणावं लागेल,”

“सरकारला वशिलेबाजीला प्रोत्साहन द्यायचं आहे का?”

-जुन्या खोंडांना नकार; शिवसेनेची पहिली पसंती प्रियांका चतुर्वेदी!

-विधानसभेनंतर राज्यसभेचंही तिकीट नाही; त्यावर नाथाभाऊ म्हणतात…