‘कोरोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे, अर्थव्यवस्थेवर याचा दीडवर्ष परिणाम होणार”

मुंबई | देश आणि राज्यावर आलेलं कोरोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे. केवळ माणसांवरच नाहीतर पशू-पक्ष्यांवरही त्याचा परिणाम होणार आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे.

कोरोनामुळे देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होणार असून प्रत्येकाचं आर्थिक गणितही बिघडणार आहे. या संकटाचा अर्थव्यवस्थेवर वर्षे-दीड वर्षे परिणाम राहील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयही मैदानात उतरली आहे. लॉकडाऊनच्या काळात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात मोठी कपात केली.

लॉकडाऊनच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना अर्थात ‘बूस्ट’ देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेने अपेक्षेप्रमाणे रेपो दरात 75 बेसिस पॉईंटची कपात केली.

महत्वाच्या बातम्या –

हीच ती वेळ, देवस्थानांनीही आपली दानपेटी समाजासाठी खुली करावी- रोहित पवार

-फक्त लॉकडाऊन करून चालणार नाही तर…; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला

-कोल्हापूरमध्येही कोरोनाचा शिरकाव; राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 130 वर

-कोरोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच भीम जयंती साजरी करू- रामदास आठवले

-खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये- उद्धव ठाकरे