“…नाहीतर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करु अशी धमकी मला दिली”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेतील आमदार विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलेपार्ले पोलीस ठाण्यात छळाबाबत पीडित सुनेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात विद्या चव्हाण आणि त्यांच्या सुन डॉ. गौरी चव्हाण यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.

माझे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप साफ खोटा आहे. चव्हाण कुटुंबीयांनी आधीच माझी बदनामी करण्याची धमकी दिली होती. त्यानुसारच हे सगळे आरोप होत आहेत. असं पीडित सुनेनं त्यांनी म्हटले आहे. तसेच तक्रार मागे घे नाही तर तुझं आयुष्य उद्धवस्त करु अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप सुनेनं केला आहे.

11 जानेवारी अगोदरच मला विद्या चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी मला घराबाहेर काढले होते. तसेच मला व माझ्या वडिलांना अर्वाच्य शिवीगाळ करीत जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप डॉ. गौरी चव्हाण यांनी केला आहे.

दरम्यान, माझ्या सुनेचे विवाह्यबाह्य संबध आहेत, असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या-

-उद्धवजी, अयोध्येला जाता त्याप्रमाणे शेतकऱ्यांकडेही जा- बच्चू कडू

-‘हा केतकर रोज कांबळेच्या दिग्दर्शनाखाली काम करतो याचा मला अभिमान’; सुजयवर टीकास्त्र

-‘साने-मंजुळे’ हे कॉम्बिनेशन तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे; शशांकचा सुजय डहाकेवर निशाणा

आजीबाईंची आईस्क्रीम संपेपर्यंत सोनालीने सांभाळली त्यांची परडी!

-केजरीवाल घाबरले?; घेतला होळी न खेळण्याचा निर्णय