राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी ही 2 नावं निश्चित; या बड्या नेत्याला डच्चू?

मुंबई |  येत्या एप्रिल महिन्यांत महाराष्ट्रातील 19 राज्यसभा खासदारांपैकी 7 खासदारांची मुदत संपतीये. त्यापैकी 4 जागा महाविकास आघाडीला मिळणार आहेत. त्यात 2 जागा राष्ट्रवादीच्या वाटेला येणार आहेत. या सात जागांसाठी येत्या 26 मार्च रोजी निवडणूक होणार आहे.

राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार यांचं नाव याअगोदरच निश्चित आहे. तर दुसऱ्या जागेवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि माजी मंत्री फौजिया खान यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातीये.

दुसरीकडे राष्ट्रवादीकडून मागील वेळी माजीद मेनन यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाली होती. परंतु, यावेळी मात्र या जागेवर महिलेला संधी दिली जाणार असल्याची माहिती कळतीये.

दरम्यान, भाजपमध्येही राज्यसभेच्या उमेदवारीवरून चुरस असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपकडून रामदास आठवले यांचं नाव निश्चित झालं असल्याने दुसरा उमेदवार कोण असेल याबाबत वेगवेगळे तर्क लावले जाऊ लागले आहेत. भाजपकडून उदयनराजे भोसले आणि संजय काकडे ही नावं चर्चेत आहेत. त्यामुळे कुणाला संधी मिळते हे पाहावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

-सरकारी कर्मचाऱ्यांचा 5 दिवसांचा आठवडा होण्याआधीच त्याविरोधात न्यायालयात याचिका

-पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; दहा रुपये भरा अन् पीएमपीचा प्रवास दिवसभर करा!

-सोनियांनी आम्हाला राजधर्म शिकवू नये; भाजपचा पलटवार

-मुस्लिमद्वेषातून फडणवीसांचा आरक्षणाला विरोध; काँग्रेसचा निशाणा

-ममतादीदी आणि काँग्रेसवाल्यांनो तुम्ही एवढं खोटं का बोलता??- अमित शहा