आम्ही लाठ्या खाऊ-जेलमध्ये जाऊ… पण उद्या आंदोलन करणारच; राष्ट्रवादी युवक आक्रमक

पुणे |  वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात मंगळवारी मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’ वर राष्ट्रवादी युवक काँग्रेस हजारो कार्यकर्त्यांच्या साथीने आंदोलन करणार आहे. मात्र हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न विद्यमान फडणवीस सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उर्से टोलनाक्यावर होणाऱ्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. आपण आंदोलन करू नये आणि जर आंदोलन केलं तर आपल्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील याची नोंद घ्यावी, असं पोलिसांनी म्हटलंय.

फडणवीस सरकारच्या विरोधात जनरल डायर घुसलाय. त्यांना त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची तोंड बंद करायची आहेत. त्यामुळेच त्यांनी आमच्या आंदोलनाला परवानगी नाकरली आहे, असं मेहबूब शेख यांनी म्हटलंय. तर कार्याध्यक्ष रवीकांत वरपे यांनी आक्रमक शब्दात आमच्यावर गुन्हे दाखल करा… आम्हाला मारा…  तुरुंगात टाका… पण आम्ही मागे हटणार नाही, असा पवित्रा घेतलाय.

राष्ट्रवादी युवकचे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले यांना पोलिसांनी आंदोलन न करण्याची नोटीस बजावलीये. यावर बेरोजगार तरूणांचा आवाज आम्ही सरकारला दाबू देणार नाही, आंदोलन करण्यावर आम्ही ठाम आहोत, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-