लस शोधली तरी…. कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर

वॉशिंग्टन | कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ जीवाचं रान करत आहेत, मात्र यादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनावरील लस जरी शोधली तरी अनेक वर्षे कोरोना कायम राहण्याची शक्यता आहे.

एआयव्ही, कांजण्या, गोवर यासारख्या आजारांप्रमाणे कोरोना देखील काही विशिष्ट भागांमध्ये सक्रीय राहू शकतो. त्यामुळे आता या आजारासोबतच जगायला शिकलं पाहिजे, असं या विषयातील तज्ज्ञांचं मत आहे.

अमेरिकेत कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे, ती नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिका कोणते प्रयत्न करते हे पाहणं महत्त्वाचं आहे. यापूर्वी कोरोनाचे चार प्रकारचे विषाणू होते, मात्र आता त्याच पाचव्या प्रकाराची भर पडली आहे.

दरम्यान, संसर्गजन्य रोगांशी मुकाबला करण्यासाठी ठोस अशा उपायांची आणि राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. येत्या काळात या गोष्टी कशाप्रकारे केल्या जातात यावर कोरोनाचं भवितव्य अवलंबून आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ही 13 शहरं अजूनही बंदिस्त राहणार, बाकीकडे लॉकडाऊन शिथील होणार…!

-खाजगी डॉक्टरांसाठी ठाकरे सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

-चीनवर आरोप करताना डोनाल्ड ट्रम्प संतापले, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-दिल्लीत भूकंपाचे धक्के; 10 ते 15 सेकंद थरथरत होती जमीन

-‘…तर मी आत्महत्या करेन’; हर्षवर्धन जाधव यांचा इशारा