पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं सगळीकडे थैमान घातलं आहे. लाॅकडाऊननंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमतीही वाढल्या असल्याचं पाहायला मिळालं. अशातच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने आतापर्यंतच्या किमतीतील सर्वोच्च उच्चांक गाठल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. या इंधन दरवाढीमुळे नागरिकही हैराण झाले आहेत.

पेट्रोल डिझेलच्या वाढणाऱ्या दरांमुळे सामान्य नागरिकांमध्ये केंद्र सरकार विरोधात चांगलाच रोष पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली.

सध्या सर्वांचंच लक्ष पेट्रोल डिझेलचे दर कमी केव्हा होणार याकडे लागलं असताना नुकतंच केंद्र सरकारनं आता पेट्रोल आणि डिझेलची कपात कमी केल्यामुळे भारतीय कंपन्यांकडूनही नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता देशभरात सलग तिसऱ्या दिवशी इंधनाचे दर स्थिर आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना तात्पुरता का होईना पण दिलासा मिळाला आहे.

मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.96 आणि 94.13 रुपये प्रतिलीटर इतका आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 104.01 रुपये आणि डिझेलची किंमत 86.71 रुपये प्रति लिटर आहे.

ऐन दिवाळीत मोदी सरकारनं दिलासा देणारी बातमी दिली आहे. आता केंद्र सरकारने दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी एक चांगली बातमी सणाच्या मुहुर्तावर मिळाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दुसरीकडे डिझेलच्या किंमतीत देखील घट केल्याचं पहायला मिळतंय. मात्र याचा फटका सरकारलाही बसणार नाही, असं या एसबीआयच्या अहवालात म्हटलं होतं.

सध्या महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये इंधनावर सर्वात जास्त कर असल्याने तो कर कमी करावा अशी मागणी भाजपकडून होत आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात.

महत्त्वाच्या बातम्या –  

  “माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात, आता मी ढवळाढवळ करू का?”

शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘हा’ नियम बदलणार

 शेवट गोड! टीम इंडियाकडून विराट कोहली आणि रवी शास्त्रींना विजयी निरोप

‘देवेंद्रजी सॉरी, तुमचं नाव…’; मोदींसमोर उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना चिमटे

“…त्यामुळे नरेंद्र मोदींना देशाची माफी मागावी”