‘आप’ नेत्याच्या घरावर सापडला पेट्रोल बाॅम्ब, गावठी कट्टे, दगडांचा साठा

नवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यांवरुन ईशान्य दिल्लीत हिंसाचार उसळला आहे. हिंसाचारात अनेकांनी आपला जीव गमावला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आमआदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसैन यांच्या घराच्या छतावर पेट्रोल बाॅम्ब, गावठी कट्टे, गलोल आणि एका मोठ्या ट्रेमध्ये मोठे दगड आढळून आले आहेत. विशेष म्हणजे गुप्तचर विभागाचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येसाठी त्यांच्या कुटुंबाने या घरातील व्यक्तींनाच जबाबदार धरले आहे.

यापूर्वी याच घराचा एक व्हिडीओ समोर आला होता. यात या घरावरुन पेट्रोल बाॅम्ब आणि दगडं फेकले जात होते. त्यामुळे दिल्लीत हिंसाचार भडकवण्यामध्ये ताहिर हुसैन यांचा हात आहे, अशी शंका घेण्यास जागा आहे.

दरम्यान, ताहिर यांनी सर्व आरोप फेटाळले असून मी निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. तसेच आपने या प्रकरणात निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-अजूनही मोदीबाबाची थोडी थोडी हवा आहे; सुशीलकुमार शिंदेंचा पंतप्रधानांवर निशाणा

-मराठीचा ‘सोशली’ वापर तब्बल हजार टक्क्यांनी वाढला

-“मराठीचं वाकडं करण्याची कोणाचीही हिंमत नाही; परकीय आक्रमाणावेळी मदतीला मराठीच धावून आलीय”

-बाळासाहेबांचा ‘तो’ इतिहास लोकं विसरलेली नाहीत; निलेश राणेंची शिवसेनेवर जहरी टीका

-बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांचा शोध घेण्यासाठी मनसेचा नवा फंडा!