हवेत उडी घेत सुपरम‌ॅनने घेतला जबरदस्त झेल; पाहा व्हिडीओ

ख्राइस्टचर्च | भारत-न्यूझीलंड यांच्यात ख्राइस्टचर्च येथे दुसरा कसोटी सामना होत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर रवींद्र जडेजाने उंच उडी मारत झेल घेतला. जडेजा हा जगातला सर्वोत्तम फिल्डरपैकी एक आहे. संघाला विकेटची गरज असताना शमीनं टाकलेल्या चेंडूवर जडेजानं हवेत उडी घेत जबरदस्त कॅच घेतला.

जडेजाच्या या कॅचमुळं नेइल वॅगनर 21 धावांवर बाद झाला. दुसऱ्या दिवशी भारतानं जबरदस्त कमबॅक केला असला तरी, न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी भारताच्या नाकीनऊ आणला.

पहिल्या पहिल्या दोन सेशनमध्ये बुमराह, शमीच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचे फलंदाज टिकू शकले नाही. बुमराहने केन विल्यम्सनला 3 धावांवर माघारी धाडले. तर, रॉस टेलरही 15 धावांवर बाद झाला. मात्र कॉलिन डी-ग्रँडहोम आणि कायल जॅमिसन यांनी भारतीय गोलंदाजांना रडवलं.

दरम्यान, न्यूझीलंडची मधली फळी अयशस्वी ठरली असली तरी, तळाच्या फलंदाजांची चांगली कामगिरी केली. भारताकडून मोहम्मद शमीने 4, जसप्रीत बुमराहने 3, उमेश यादवने 1 तर रवींद्र जडेजाने कायलला बाद करत न्यूझीलंडचा डाव संपवला.

 

 

 

महत्वाच्या बातम्या-

-दैनिक ‘सामना’ची धुरा आता रश्मी ठाकरेंच्या हातात

-बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर च्या अडचणीत वाढ; देशद्रोहाची तक्रार दाखल

-‘कोरोनो’चा हाहाकार; पाहा आता काय घडलं!

-विश्वचषकातील ‘लेडी सेहवाग’ची तुफान फलंदाजी पाहून मास्टर ब्लास्टर म्हणतो…

-आदित्य ठाकरे यांचं पर्यावरण प्रेम साफ खोट; मनसेची खोचक टीका