विखे पाटलांच्या फ्लेक्सवरून भाजप गायब, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

अहमदनगर | भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा ‘यू टर्न’ मारण्याच्या तयारीत दिसत आहेत. विखे पाटील आता भाजपची साथ सोडून सत्ताधारी महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल आपल्या श्रीरामपूरमधील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर भाजप गायब आहे. या कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्ह्यातील किंवा राज्यातील कोणतेही नेते उपस्थित नव्हते.

या कार्यक्रम स्थळी लावलेला एक फ्लेक्स सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. ‘चलो एक पहल की जाए… नए रस्ते की ओर…’ असं या होर्डिंगवर लिहिलं होतं. याचा नेमका अर्थ काय घ्यावा, यावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचं मुंबईत उद्घाटन झालं, त्यावेळी भाजपचे अनेक नेते हजर राहिले होते. मात्र विखेंच्या ऑफिसच्या उद्घाटनाकडे भाजप नेत्यांनी पाठ फिरवल्याने भुवया उंचावल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-64MP कॅमेरा असलेला शाओमीचा हा लोकप्रिय फोन झाला आणखी स्वस्त!

-माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला इंदुरीकरच जबाबदार असतील- तृप्ती देसाई

-“अजितदादा आपण इतकी वर्षे उगाच वेगळे राहिलो”

-“ज्यांना जागांची पन्नाशी गाठण्यासाठी पावसात भिजावं लागलं, त्यांनी भाजपला न बोललेलंच बरं”

-आम्ही शिवभक्त अन् छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे- उद्धव ठाकरे