जगातल्या सर्वात शक्तिशाली 100 महिलांच्या यादीत निर्मला सितारामण यांच्या नावाचा समावेश

नवी दिल्ली | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचा फोर्ब्सच्या जगातल्या सर्वाधिक शक्तीशाली 100 महिलांच्या यादीत आहे. सितारामण यांनी जगातल्या सर्वाधिक शक्तीशाली महिलांच्या यादीत 34 वा क्रमांक पटकावला आहे.

मोदी सरकाच्या पहिल्या टर्ममध्ये निर्मला सितारामण यांनी संरक्षण खातं सांभाळलं होतं. त्यानंतर मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्या अर्थ खातं सांभाळत आहेत. विशेष म्हणजे त्या देशातल्या पहिल्या महिला अर्थमंत्री आणि संरक्षणमंत्री आहेत.

फोर्ब्सच्या या यादीत जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केन या पहिल्या स्थानी आहेत. या यादीत एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोशनी नडार-मल्होत्रा, बायोकॉनच्या प्रमुख किरण मुझूमदार शॉ यांच्या नावाचा समावेश आहे.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचा फोर्ब्सच्या जगातल्या सर्वाधिक शक्तीशाली 100 महिलांच्या यादीत समावेश झाल्याने देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महत्वाच्या बातम्या-