“गेल्या सहा वर्षात पाकिस्तानमधून आलेल्या 2 हजार 838 लोकांना भारतीय नागरिकत्व”

चेन्नई | गेल्या सहा वर्षात पाकिस्तानमधून आलेल्या 2 हजार 838 लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली आहे.

देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सर्व वाद सुरू आहे. अनेकांकडून या कायद्याला विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर निर्मला सितारामण यांनी केलेलं हे वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे.

गेल्या सहा वर्षात पाकिस्तानमधून आलेल्या 2 हजार 838, अफगाणीस्तानमधून आलेल्या 914 आणि 172 बांगलादेशींना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे, असं निर्मला सीतारामण यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सरकार कुणाचंही नागरिकत्व काढून घेत नाही. हा कायदा प्रत्येकासाठी चांगला आहे. आम्ही फक्त काही लोकांना नागरिकत्व देणार आहोत, असं निर्मला सितारामण यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हा – नितीन गडकरी

-पराभवामुळे चंद्रकांत खैरे काहीही बरळतात- रावसाहेब दानवे

-भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे.पी. नड्डा यांची वर्णी!

-पाच वर्षांपूर्वीच शिवसेनेकडून काँग्रेसला सत्तेचा प्रस्ताव, पण…; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

-बहीणीच्या भावाला शुभेच्छा, भावाचा टोमणा मारत स्वीकार!