रायगडमधील ‘या’ समुद्र किनाऱ्यावर चक्री वादळाची शक्यता

रायगड | 3 जून रोजी कोकण समुद्र किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकणार आहे. सकाळी 5.30 वाजता वादळाचा जोर जास्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  100 ते 125 ताशी वाऱ्याचा वेग असण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊन मोठी हानी होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या वादळाची झळ अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, उरण समुद्रकिनाऱ्यावरील 62 गावांना बसणार आहे.

या गावांची लोकसंख्या 1 लाख 77 हजार आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ टीम अलिबाग, श्रीवर्धन तालुक्यात दाखल झाली आहे. या टीममध्ये एकूण 22 जवान आहेत. तर उरण नागरी संरक्षण दल आणि मुरुडमध्ये कोस्टगार्ड तैनात ठेवण्यात आले आहेत.

या सर्व टीम सध्या परिसराची पाहणी करणार आहे. घरात राहणाऱ्या नागरिकांचे शाळा, समाज मंदिर, अंगणवाडी तसेच इतर ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मनोज तिवारी यांना धक्का; भाजपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी

-“नोकऱ्या गेल्या असतील, पगार कपात झाली असेल तर आम्हाला संपर्क साधा”

-कौतुकास्पद! घरी परतणाऱ्या कामगारांना मोहम्मद शमी करतोय अन्नदान

-निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज- उद्धव ठाकरे

-‘…तर तोंड बंद ठेवा’; पोलीस अधिकाऱ्याचा डोनाल्ड ट्रम्प यांना सल्ला