सोलापुरात गारपीटीसह जोरदार पाऊस, द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान

सोलापूर | सोलापूर शहरासह अनेक ग्रामीण भागांमध्ये आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी वादळी वारा आणि गारांसह पाऊस झाला.

सोलापूर शहरात एकीकडे कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे सोलापुरात झालेल्या गारपीटीसह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

कोरोनामुळे सोलापुरातील शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यातच अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट ओढवले आहे.

पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांनी जनावरांसाठी ठेवलेल्या कडब्याचंही पावसात नुकसान झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…तर आम्ही दोघींनी समोर येऊन माफी मागितली असती

-राज्यातील मजुरांना ठाकरे सरकारचा आधार केली ऐवढी मदत

-“जामीन हवा असेल तर PM Cares Fund साठी 35 हजार द्या”

-संयुक्त राष्ट्र प्रमुखांचा भारताला ‘सलाम’; मदतीचा हात दिल्याबद्दल कौतुक

-“पण तीन महिन्यानंतर, तीन महिन्याचे पैसे माणसाने आणायचे कुठून???”