बलात्कार प्रकरणातल्या दोषींना महिनाभरात फाशीवर चढवा- खासदार नुसरत जहाँ

मुंबई | हैदराबाद बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर काल झालेला एन्काऊंटरनंतर देशातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पश्चिम बंगालमधल्या बसिरहटच्या खासदार नुसरत जहाँ यांनी बलात्कार करणाऱ्या नराधमांना कोणती शिक्षा दिली जावी, यावर आपलं मत मांडलं आहे.

बलात्कार प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांना महिनाभरात फाशीवर चढवा, असा उपाय नुसरत यांनी सुचवला आहे. बलात्कार करणाऱ्यांप्रती प्रचंड आक्रोश व्यक्त होत आहे. नुसरत यांनीही आपला संताप व्यक्त केला आहे.

नाही म्हणजे नाही. कायदा कितीही कठोर असला तरी प्रशासन आणि पोलिसांना जबाबदारीने वागायला पाहिजे. जामीन नको. माफी नको. दोषी आढळल्यास एका महिन्यात फासावर लटकवा, असं ट्वीट नुसरत यांनी केलं आहे.

दरम्यान, हैदराबादच्या बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट आहे. देशभरातून बलात्कार करणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी होत आहे.

नुसरत जहाँ यांचं ट्वीट

 

महत्त्वाच्या बातम्या-