दुर्गापूजा करणं इस्लामचा अपमान; नुसरत जहाँ पुन्हा ट्रोल

नवी दिल्ली | बसीरहटच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांच्यावर पुन्हा टीका होत आहे. कोलकतामधल्या दुर्गाभवनमध्ये त्या आपले पती निखिल जैन यांच्यासोबत दुर्गापूजेसाठी गेल्या होत्या. दुर्गापूजा करतानाचे नुसरत यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे मुस्लीम धर्मगुरू त्यांच्यावर नाराज झाले आहेत.

नुसरत जहाँ जे काही वागतात ते मुस्लीम धर्माला अनुसरून नाही. मुस्लीम धर्माचा अपमान करणारं आहे.  त्यांना धर्माबाहेर जायचे असेल तर त्यांनी सगळ्यात आधी आपलं नाव बदलावं, असं देवबंदी इथल्या उलेमांचं म्हणणं आहे.

जर नुसरत जहाँला इस्लामच्या शिकवणीविरुद्ध जाणारी कामं करायची असतील तर त्यांनी आधी आपलं नाव बदललं पाहिजे. अशा प्रकारे वागून त्या इस्लाम धर्माचा अपमान का करत आहेत?, असा प्रश्न उलेमांनी विचारला आहे. मला जे वाटतं तेच मी करते. अशा गोष्टींकडे मी लक्ष देत नाही, असं म्हणत नुसरत यांनी  त्याच्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.

नुसरत यांनी निखील जैन यांच्याशी विवाह केल्यानंतर हिंदू धर्माप्रमाणे त्या कपाळावर कुंकू लावतात म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते. सोबतच लोकसभेत पाश्चिमात्य पेहरावात जाण्यावरून नुसरत यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

दरम्यान, नुसरत जहाँ यांना वारंवार ट्रोल केलं जातं मात्र त्या अतिशय खंबीरपणे आपली बाजू मांडताना दिसतात. मला लोकांच्या बोलण्याने काहीही फरक पडत नाही, असं त्या ठणकावून सांगताना दिसतात. 

महत्वाच्या बातम्या-