आरोग्यविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार 4 महिन्यांचा अ‍ॅडव्हान्स पगार

मुंबई | कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणं सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्वाचं काम आहे.याची पूरेपूर जाणीव असल्यानेच ओडिशातील नवीन पटनाईक सरकारने आरोग्यविभागाच्या कर्माचाऱ्यांना 4 महिन्यांचा अॅडव्हान पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संकटाचा अंदाज घेऊन ओडिशा सरकारने आपले अनेक जिल्हे यापूर्वीच लॉकडाऊन केले आहेत. त्यानंतर मंगळवारी मध्य रात्रीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

कोरोना विषाणूचा देशभरात वेगाने फैलाव होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आजवर देशात 11 करोनाग्रस्तांचे मृत्यू झाले आहेत. राजधानी दिल्लीत दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर तामिळनाडूत देखील एक मृत्यू झाल्याचं समजत आहे.

दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढला आहे. एकूण 606 रुग्ण कोरोनाव्हायरसच्या विळख्यात आहे. त्यापैकी 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 122 रुग्ण आहेत.

 

महत्वाच्या बातम्या – 

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक मंत्र्यांनी घेतला हा मोठा निर्णय!

-दिलासादायक! पुण्यात 24 तासांत 5 जण कोरोनामुक्त, 48 तासांत एकही नवा रुग्ण नाही

-ठाकरे सरकारच्या राज्यात पोलीस बेफाम, पत्रकाराला केली मारहाण

-मोदी सरकार 80 कोटी लोकांना 2 रूपये किलोने गहू आणि 3 रूपये किलोने तांदूळ देणार

-महाभारताचं युद्ध 18 दिवसांत जिंकलं, कोरोनाचं युद्ध 21 दिवसांत जिंकायचंय- नरेंद्र मोदी