मुंबई | सध्या पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सध्या इंधनाच्या दरांमध्ये जवळपास दररोज वाढ होत आहे. अशा परिस्थितीत मध्यवर्ती उत्सव आणि विश्वस्त समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात एक रुपयात एक लिटर पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापुरातील डफरीन चौक येथील पेट्रोल पंपावर आजच्या दिवशी नागरिकांसाठी एक रुपयात एक लिटर पेट्रोल उपलब्ध करण्यात येणार आहे.
सोलापुरातील मध्यवर्ती उत्सव समितीच्या वतीने 14 एप्रिल ते 17 एप्रिल असा जयंती उत्सव सप्ताह जाहीर करण्यात आला आहे. एप्रिल रोजी भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. विविध ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करुन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेबांची 131 जयंती आज साजरी होत आहे. त्यासाठी, गल्लीपासून दिल्लीपर्यंत विविध उपक्रमांनी यंदा जयंतीउत्सव साजरा होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
खासदार संभाजीराजे मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
‘तुला दिग्दर्शकासोबत…’; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
“तुम्ही राज्य चालवताय, का हजामत करताय?”
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2022 | आंबेडकर जयंती का साजरी केली जाते?, जाणून घ्या
लोडशेडिंगबाबत नितीन राऊतांचं मोठ वक्तव्य, म्हणाले…