“रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्या”

मुंबई | टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी करणारी एक ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली आहे.

चेंज डॉट ओराजी या वेबसाईटच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. संपूर्ण जगभरातून तब्बल 2 लाख 40 हजार लोकांनी याला सोशल मीडियावर पाठिंबा दर्शवला असून अजूनही ही संख्या वाढत चालली आहे.

ऑनलाईन याचिकेमधून रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. रतन टाटा हे परोपकार आणि मानवतेचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी अनेक संशोधनासाठी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था उभारण्यासाठी आर्थिक मदत केली, असं या याचिकेमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या याचिकेमध्ये रतन टाटा यांनी मदत केलेल्या सर्व संस्थांची यादी करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या समाजसेवेची देखील लिस्ट देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

-म्हणून… ससूनच्या निवासी डाॅक्टरांनी दिला सामूहिक राजीनाम्याचा इशारा

-सगळा देश एकजुटीने लढत आहे, मात्र काही जण धर्माच्या नावाने धंदा करतायत- इरफान पठाण

-रिव्हर्स रेपो रेट 4 टक्क्यांवरून 3.75 टक्क्यावर,आरबीआय गव्हर्नर शक्तीकांता दास यांची माहीती-सगळा देश एकजुटीने लढत आहे, मात्र काही जण धर्माच्या नावाने धंदा करतायत- इरफान पठाण

-ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. चंदनवालेंची तडकाफडकी बदली

-चीनमधून तब्बल 6 लाख रॅपिड किट भारतात दाखल