या गावात आहे फक्त महिलांचंच राज्य, पुरुषांना गावात येण्यासही मनाई!

आज सर्व क्षेत्रात आपल्याला महिला असलेल्या पाहायला मिळतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करताना दिसतात. आता पूर्वीसारखं पुरुषप्रधान संस्कृती राहिलेली नाही. महिला आणि पुरुषांना समान अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. महिला आता स्वतःच्या कामाला, स्वतःच्या आयुष्याला महत्व द्यायला लागल्या आहेत. याचंच एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे आफ्रिकी देश केनिया मधील एक गांव.

उत्तर केनियाच्या समबुरुमध्ये उमोजा नावाचं एक गाव आहे. या गावामध्ये फक्त महिलांचं राज्य आहे. महिला राहत असल्यामुळे या गावात पुरुषांना येण्यास सक्त मनाई आहे.

या गावात सुरुवातीला फक्त 15 महिला होत्या. ज्यांच्यावर 1990 मध्ये ब्रिटिश सैनिकांनी बलात्कार आणि लैंगिक शोषण केलेलं होतं. मात्र आज हेच गाव पीडित महिलांसाठी एक सुरक्षित छत्र बनलं आहे. सुरक्षिततेसाठी या गावाला काटेरी कुंपण बसवण्यात आलं आहे.

समबुरु समुदयावर पितृसत्तेचं वर्चस्व आहे. या समुदयातील लोक बहुविवाहामध्ये विश्वास ठेवतात. सध्या या गावात जवळपास 50 महिला राहतात. महिलांसोबत त्यांची मुलेही तेथेच राहतात. त्या मुलांची संख्या 200 च्या आसपास आहे. यामध्ये जर कोणी मुलगा असेल तर त्याला 18 वर्षांचं होताच गाव सोडावं लागतं.

या गावात महिला स्वतःच्या मर्जीनं आपलं जीवन जगतात. कोणाच्याही दबावाखाली न येता आनंदानं जीवन जगत असतात. कोणावरही आधारित न राहता त्या आपली उपजिविका करतात. उपजिविका भागवण्यासाठी महिला मोत्यांचे दागिने बनवून विकतात.

दागिन्यांमध्ये बांगड्या, नेकलेस, पैंजण यांचा समावेश असतो. या दागिन्यांना विकून ते आपली उपजिविका करतात. एवढंच नाही तर या महिलांनी गावातच एक शाळाही उघडली आहे. याचबरोबर त्या मोठ्या महिला तरुणींना खतना, जबरदस्ती गर्भपात करणे काय असतं याविषयी माहिती देतात.

महत्वाच्या बातम्या – 

खजूर खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

अर्णव गोस्वमिंच्या अडचणीत वाढ! न्यायालयाने ‘या’ कारणाने गोस्वमिंविरोधात उचललं कठोर पाऊल

भाजपला झटके सुरूच! आणखी एका बड्या नेत्याचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

अबब… सोनं आतापर्यंत 9 हजार रुपयांनी स्वस्त; तज्ज्ञांनी दिलाय धक्कादायक इशारा

शिल्पा शेट्टीचे अक्षय कुमारवर अत्यंत धक्कादायक आरोप, व्हिडीओ व्हायरल