काल पद्म भूषण जाहीर अन् आज FIR दाखल, सुंदर पिचाईंच्या अडचणीत वाढ

मुंबई | सध्या काॅपीराईटची विविध प्रकरणं समोर येत आहेत. अशात एक प्रकरण प्रचंड गाजत आहे. एका सिनेमाच्या निर्मात्यांनी चक्क गुगलच्या सीईओ यांना कोर्टात खेचलं आहे.

गुगलचे सीईओ भारत वंशाचे सुंदर पिचाई हे आहेत. केंद्र सरकारनं नुकतच त्यांना पद्म भूषण पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. पण सध्या पिचाई हे अन्य एका कारणानंही चर्चेत असतात.

सुंदर पिचाई यांच्यासहित कंपनीच्या आणखीन पाच जणांविरोधात काॅपीराईट अधिनियमाच्या अंतर्गत एफआरआय दाखल करण्यात आला आहे. परिणामी सध्या हे प्रकरण गाजत आहे.

एक हसीना थी, एक दिवाना था या बाॅलिवूड चित्रपटाचा काॅपीराईट केल्याचा चित्रपटाच्या निर्मात्यांनी आरोप केला आहे. दिग्दर्शक सुनिल दर्शन यांंनी हा चित्रपट यु-ट्यूब वर अपलोड केल्याचा आरोप केला आहे.

कोणतेही हक्क न घेता अधिकार नसलेल्या लोकांना हा चित्रपट अपलोड करण्याची परवानगी गुगलने दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांमुळं पिचाई अडचणीत आले आहेत.

काॅपीराईटचं उल्लंघन केल्याप्रकरणी दर्शन यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानं पिचाई आणि अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

अंधेरी पश्चिमेतील एमआयडीसी पोलिसांनी याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. काॅपीराईट अॅक्ट 1957 नुसार कलम 51, 63, 69 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणीतरी माझ्या चित्रपटाद्वारे पैसे कमावत आहे. याबाबत मी अनेकदा गुगल व्यवस्थापकांकडे हा चित्रपट काढून टाकण्याची विनंती केली पण त्यांनी तो काढला नाही. परिणामी मला न्यायालयात जावं लागलं, असं सुनिल दर्शन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुनिल दर्शन हे बाॅलिवूडमधील एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. 2017 साली त्यांचा एक हसीना थी हा शेवटचा चित्रपट होता. सध्या दर्शन यांच्या तक्रारीने पिचाई चांगलंच अडचणीत सापडले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “मुख्यमंत्र्यांनी त्वरित निर्णय घ्यावा नाहीतर…”; गोपीचंद पडळकरांचा सरकारला थेट इशारा

“मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा विरोधी पक्ष नामर्द”, संजय राऊतांचा हल्लाबोल

भारतात फिरू नका, बलात्कार, दहशतवादाच्या घटना वाढत आहेत- जो बायडन

“हे सरकारी ऑफिस आहे, कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये” 

युवराज सिंग झाला बाबा, घरी छोट्या ‘युवराज’चं आगमन