ट्रेनबाबतची अफवा पसरवणाऱ्याची चौकशी होणार- अनिल देशमुख

मुंबई | मुंबईतील वांद्रे भागात काल हजारो मजुरांचा जमाव जमला होता. लॉकडाउन वाढवला तरीही ट्रेन सुरु होतील अशी आशा त्यांना होती. त्यामागचे कारण ही अफवा होती. या अफवेमुळेच सगळा जमाव जमला होता. यावर ट्रेनबाबतची अफवा पसरवणाऱ्याची चौकशी होणार असल्याचं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

ट्रेन सुरु होणार या ही अफवा कोणी पसरवली त्याबद्दलचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी चौकशी करुन अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे आदेश अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

कोरोनाचा लढा आता अधिक तीव्र झाला आहे. देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. मात्र आज मुंबईतील वांद्रे स्टेशनबाहेर ट्रेन सुटेल आणि आपल्याला घरी जायला मिळेल या आशेने हजारो लोकांचा जमाव जमा झाला होता.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही परप्रांतीयांनी घाबरु नये तुम्ही महाराष्ट्रात सुरक्षित आहात, तसंच लॉकडाउन म्हणजे लॉकअप नाही, असं म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

-“पंतप्रधानांच्या कॉन्फरन्समध्ये आदित्य ठाकरे मोबाईलवर खेळत बसले नसते तर ही वेळ आलीच नसती”

-राज आणि माझ्यात सारखं बोलणं सुरू आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

-लॉकडाऊनदरम्यान मजुरांची गर्दी जमविल्याचा आरोप; विनय दुबेला अटक

-जे काल घडलं, ते यापुढे घडू नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी – शरद पवार

-गावी जाण्याच्या हट्टापायी मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांची हजारोंची गर्दी