युक्रेनने तो प्रस्ताव फेटाळला; संतापलेल्या रशियानं केली मोठी घोषणा

मुंबई | युक्रेनने बेलारूसमध्ये (Belarus) चर्चेचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं सैन्याला युक्रेनमध्ये सर्व दिशांनी आक्रमण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

युक्रेनवर आता चारही दिशांनी हल्ला केला जाईल, असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेननं रशियाचा चर्चेचा प्रस्ताव स्वीकारलेला नाही, त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जाईल.

जारी केलेल्या निवेदनात रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे की, लष्कराला आपला हल्ला तीव्र करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि आता सर्व दिशांनी हल्ले केले आहेत. बेलारूसमध्ये होणाऱ्या चर्चेचा प्रस्ताव कीवने फेटाळला आहे.

आता माहितीसाठी सांगतो की, काल रशियाने युक्रेनला चर्चेचा प्रस्ताव दिला होता. रशियाचे शिष्टमंडळ Belarus ला पाठवल जाईल, असं त्या प्रस्तावात म्हटलं होतं. पण आता युक्रेननं तो प्रस्ताव फेटाळल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालय करत आहे.

रशियन सैन्याचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, युक्रेनियन बाजूने वाटाघाटी प्रक्रिया नाकारल्यानंतर, आज सर्व युनिट्सला ऑपरेशनच्या योजनांनुसार सर्व दिशांनी हल्ला तीव्र करण्याचे आदेश देण्यात आलेत.

युक्रेनच्या भूमीवर कहर करणारे रशियन सैनिक आता अधिक वेगाने आणि धोकादायक पद्धतीने हल्ले करणार आहेत. वरून फर्मान आलं आहे, अशा स्थितीत आजचा दिवस अधिक भयावह ठरू शकतो.

महत्वाच्या बातम्या- 

‘या’ भागात येत्या काही तासात पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा इशारा 

“शरद पवारांना 2024 ला सर्वात मोठी भेट द्यायची”

बँकेची कामं आताच आटोपून घ्या! पुढील महिन्यात बँका 13 दिवस बंद राहणार; पाहा तारखा

“माझा राजा उपाशी असताना मी घरात कसा बसू? छत्रपतींचा मावळा म्हणून…”

“नवाब मलिक जेलमध्ये आहेत, मग अजित पवार बाहेर कसे?”